Last Updated: Thursday, March 29, 2012, 12:29
www.24taas.com, जलालाबाद 
अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाबाहेर काही वेळापूर्वीच एक स्फोट झाला आहे. अफगाणिस्तानमधील पूर्व भागात असणाऱ्या जलालाबाद मधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर एक मोठा स्फोट झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार या स्फोटात किती जखमी झाले आहेत किंवा काही जीवितहानी झाली आहे का? याची काहीही माहिती अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही.
पण त्याचबरोबर भारतीय दूतावासातील सारे भारतीय राजदूत गे सुरक्षित असल्याचे समजते. तसचं या स्फोटाची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या या स्फोटाचा भारतीय राजदूतांना 'टार्गेट' करण्याचा प्रयत्न होता का? असा देखील प्रश्न उपस्थित होतो.
भारतीय दूतावासाबाहेर करण्यात आलेला स्फोट हा शक्तीशाली स्फोट होता. त्यामुळे हा स्फोट बॉम्बस्फोट असल्याचे स्पष्ट होते.. त्यामुळे तालिबानी आतंकवाद्यांनी पुन्हा एकदा स्फोटाची जबाबदारी घेतली आहे.
First Published: Thursday, March 29, 2012, 12:29