Last Updated: Friday, March 30, 2012, 12:47
www.24taas.com, इस्लामाबाद ९/११च्या हल्ल्यानंतर अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये पाच ठिकाणी राहत असल्याची माहिती त्याच्या लाडक्या ३० वर्षय बायकोने दिली आहे. पाकमध्ये पाच घरे असल्याचे तिने म्हटले आहे.
लादेनची पाकिस्तानमध्ये पाच घरे आणि चार मुले आहेत. हे लादेनची पत्नी अमल अहमद अब्दुल फतेह हिने सांगितले आहे. लादेनचे ९ वर्षे पाकिस्तानमध्ये वास्तव्य होते. त्याच्यादोन मुलांचा जन्म येथील सरकारी रुग्णालयात झाला आहे, असे एका चौकशी दरम्यान अमल हिने सांगितले.
पाकिस्तानमधील एबोटाबादमध्ये राहत असलेल्या लादेनच्या घरावर अमेरिकेने गेल्या वर्षी हल्ला करून, त्याला ठार केले होते. पाकिस्तानमध्ये अनधिकृत वास्तव्य केल्याबद्दल पोलिसांनी लादेनच्या पत्नी आणि मुलांना अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अल कायदाची सर्व सूत्रे लादेन येथून सांभाळत होता. ही माहिती त्याची पत्नी अमल हिने दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
First Published: Friday, March 30, 2012, 12:47