नाटो हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क - Marathi News 24taas.com

नाटो हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
 
अमेरिकेच्या लष्कराला अफगाणिस्तानात टार्गेट केले गेल्याने अमेरिकेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यावर तातडीने उपाय काढीत नवे दल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास 'पालक देवदूत' स्थापन केले आहे.
 
 
अफगाणिस्तानातील 'नाटो' लष्करांवरच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे अमेरिकी सैनिकांच्या सुरक्षेसाठी हे दल तयार करण्यात आले आहे.  हे दल आता खास देखरेख करणार आहे. अमेरिकी सैनिक झोपेत असतील, तरी त्यांच्या सुरक्षिततेकडे डोळे उघडे ठेवून लक्ष देण्याची जबाबदारी या दलाकडे सोपविण्यात आली आहे. या दलामुळे अमेरिकेच्या लष्कराला दिलासा मिळणास मदत आझी आहे.
 
 
अमेरिकी दलांचे अफगाणिस्तानातील प्रमुख जनरल जॉन ऍलन यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत.  अमेरिकेच्या नाटो फौजांवर अफगाणी नागरिकांकडून होणारे हल्ले टाळण्याचा प्रयत्न ही दले करतील.  त्यासाठी या दलांचा वापर करण्यात येणार असल्याच जॉन यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, स्वतःच्या बचावासाठी अमेरिकी नागरिक आता अफगाणी सरकारच्या मंत्रालयांमध्येही शस्त्रे घेऊन जाऊ शकतील, अशी परवानगी देण्यात आली आहे.

First Published: Saturday, March 31, 2012, 14:23


comments powered by Disqus