विन्चीचं दुर्मिळ चित्र प्रदर्शनात - Marathi News 24taas.com

विन्चीचं दुर्मिळ चित्र प्रदर्शनात

www.24taas.com, पॅरिस
 
लिओनार्दो द विन्ची शेवटचं पेंटिंग 'द वर्जिन अँड चाईल्ड विथ सेंट ऍन' तसंच जगप्रसिद्ध मोनालिसाचे दोन एकसारखे पेंटिंग पॅरिसमध्ये लुव्र म्युझियममध्ये डिस्प्ले करण्यात आले. एका मोठ्या प्रदर्शनात हे पेन्टिंग ठेवण्यात आले होते.
 
या प्रदर्शनात द विन्चीच्या आणखीही ब-याच पेंटिंग ठेवण्यात आल्यात. त्यासोबतच विन्सीच्या सहाय्यक आणि विद्यार्थ्यांच्या पेंटिंगमुळे हे प्रदर्शन आणखी आकर्षक झालंय. या प्रदर्शनात मध्यभागी एक ओळखीचं हसरं सुंदर चित्र आपलं लक्ष वेधून घेतं. आणि ते आहे मोना लिसाचं. मोनालिसाचं हे चित्र लिओनार्दोच्या सहाय्यकानं चितारलंय.
 
दा व्हिन्सी ज्यावेळी मोनालिसाचं चित्र आपल्या कुंचल्यातून साकारत होता त्याचवेळी त्याच्या सहाय्यकानं हे पेन्टिंग तयार केलंय. मोनालिसाची ही दोन्हीही पेंटिंग सुरक्षेच्या कारणास्तव वेगवेगळ्या रुम्समध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जगप्रसिद्ध मोनालिसाचं चित्र पाहण्यासाठी या म्युझियमध्ये चित्रप्रेमींची मोठी गर्दी होतेय.

First Published: Saturday, March 31, 2012, 23:30


comments powered by Disqus