Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:02
www.24taas.com, वॉशिंगटन अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया राज्यातील एका धार्मिक कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. या घटनेत देविंदर कौर थोडक्यात बचावली आहे. देविंदर कौरच्या हातात गोळी घूसली असून तिला ऑकलँडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ऑकलँड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख पटली असून तो ४३ वर्षीय मूळ कोरियन वंशाचा आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या ऑकलंड येथे ख्रिश्चन धार्मिक संस्थेचे हे नर्सिंग कॉलेज आहे. ऑकलँड ट्रायबूनने दिलेल्या माहितीनुसार कौरने आपल्या कुटुंबियांना सांगितलं की मारेकरी अनेक महिन्यांपासून कॉलेजमध्ये गैरहजर होता. काल तो अचानक कॉलेजमध्ये आला आणि सर्व विद्यार्थ्यांना भींतीलगत एका ओळीत उभं राहण्यास फर्मावलं. या आरोपीने बंदूक काढल्यानंतर एकच घबराट पसरली आणि विद्यार्थी सैरावैरा पळू लागले.
ट्रायबूनने दिलेल्या बातमीनुसार कौर एका विद्यार्थ्याला मदत करत असताना तिच्या हाताला गोळी लागली. गोळी लागल्यानंतर कौर बाहेरच्या दिशेने धावली आणि तिने आपला भाऊ पाल सिंहला बोलावलं. गोळीबारात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघेजणांनी रुग्णालयात दम तोडला.
First Published: Tuesday, April 3, 2012, 15:02