Last Updated: Tuesday, April 3, 2012, 21:36
www.24taas.com, नवी दिल्ली 
टाईम मॅग्झीननं केलेल्या सर्वेक्षणात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपेक्षा अधिक प्रभावशाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मॅगझीननं जगातल्या शंभर व्यक्तींविषयी हा ऑनलाईन पोल घेतला होता.
अकराव्या क्रमांकावर असलेल्या मोदींनी ओबामांसह सचिन तेंडुलकर, नितीशकुमार आणि अण्णा हजारेंनाही पिछाडीवर टाकलं आहे. जगभरातल्या वाचकांसाठी ऑनलाईन सर्वेक्षण पोलसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं.
पण काही दिवसापूर्वी भारतात अण्णांच्या आंदोलनाने जोर धरला होता. त्यामुळे अण्णा हे टाईम मॅग्झिनमध्ये झळकले होते. मात्र आता मोदींनी सगळ्यांच मागे टाकले आहे. यामुळं देशात विकासपुरूष अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना यश मिळू लागल्याचंच यातून स्पष्ट होतंय.
First Published: Tuesday, April 3, 2012, 21:36