Last Updated: Wednesday, April 4, 2012, 17:43
www.24taas.com,वॉशिंग्टन अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये आलेल्या दोन वादळांमुळे जबरदस्त नुकसान झाले आहे. या वादळाचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त नाही.
हवामान खात्याने या वादळाचा अलर्ट दिला होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हे वादळ काहीकाही काळ राहील. आलेल्या दोन वादळांमुळे घबरहाट पसरली आहे. स्थानिक वृत्तवाहिनीने दाखविलेल्या दृश्यांध्ये शाळेच्या बस, ट्रक आणि रेल्वेचे डब्बे हलत होते. जोराच्या वादळामध्ये घरांचे नुकसान झाले.
दरम्यान, या तुफानी वादळमुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. तर काही विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. या वादळामुळे अमेरिकेतील सर्व विमान उडाने रद्द करण्याचे राष्ट्रीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
First Published: Wednesday, April 4, 2012, 17:43