पाकमध्ये बॉम्बहल्ल्यात सहा ठार - Marathi News 24taas.com

पाकमध्ये बॉम्बहल्ल्यात सहा ठार

www.24taas.com, इस्लामाबाद 
 
पाकिस्तानात बॉम्बहल्ल्यात सहा जण ठार झाले तर अन्य नऊ जण जखमी झाले. या गाडीतून 15 जण खुराकाइहून जमरूड गावाकडे जातअसताना हा बॉम्ब हल्ला झाला.
 
 
हा हल्ला खैबर या आदिवासी भागात आज  बुधवारी झाला.  गाडीत स्फोटके ठेवण्यात आली होती किंवा रस्त्याच्याकडेला बॉम्ब पेरले होते याबाबत मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात सात जण हे जागीच ठार झाले तर अन्य नऊ जण हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तीघांची प्रकृती ही गंभीर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रियाझ खान यांनी दिली. या खैबर प्रांतात तालिबान आणि अल्‌ कायदा यांचेच वर्चस्व आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

First Published: Wednesday, April 4, 2012, 23:00


comments powered by Disqus