सैफ अल इस्लामला पकडल्याचा दावा - Marathi News 24taas.com

सैफ अल इस्लामला पकडल्याचा दावा

झी २४ तास वेब टीम
लिबयातील हंगामी सरकारने पदच्युत नेते कर्नल मुआम्मार गडाफी यांचा मुलगा सैफ अल इस्लाम याला आपल्या सैनिकांनी पकडल्याचा दावा केला आहे. सैफ अल इस्लामला जर पकडण्यात यश आलं असलं तर जून्या सरकारमधला तो शेवटची व्यक्ती आहे ज्याच्या निष्ठावंतांना एकत्र करण्याची क्षमता आहे. न्यायाधीश मोहम्मद अल अलगे यांनी सैफ अल इस्लाम गडाफीला ओबारी भागात पकडल्याचं रॉयटर्स सांगितलं. एकेकाळी लिबयात परिवर्तन व्हावं या मताचा असलेला सैफने देशात उठाव झाल्यानंतर वडिलांप्रमाणेच बंडखोरांना चिरडून टाकण्यासाठी कडक भूमिका घेतली. हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने जून महिन्यात सैफ लिबयाचा पंतप्रधान असल्याचं म्हटलं होतं आणि त्याच्या विरोधात तसंच मुआम्मार गडाफी आणि गुप्तचर प्रमुखांच्या विरोधात अटक वॉरंट बजावलं होतं. लिबयात असलेल्या परदेशी पत्रकारांनी सैफ अल इस्लामला अद्याप कस्टडी पाहिलेलं नाही.
 
याआधीही लिबयातील हंगामी सरकारने सैफला पकडल्याचा दावा केला होता आणि जेंव्हा सैफ त्रिपोलीच्या रसत्यावरुन फिरताना दिसला तेंव्हा तो खोटा ठरला होता. मागच्या महिन्यात हंगामी सरकारमधील नेत्यांनी कर्नल गडाफीला जीवंत पकडल्याचा दावा केला होता आणि नंतर त्याल कस्टडी मारण्यात आलं. सैफला सीमा ओलांडताना लिबयाच्या दक्षिण भागात बंडखोरांनी पकडल्याचं सांगण्यात येतं आहे. सैफने आपलं शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पूर्ण केलं होतं. लिबयाचे आधुनिकीकरण आणि उदारीकरण व्हावं असं सैफ अल इस्लामचे मत होतं. सैफने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार, खाजगी गुंतवणुकीला चालना तसंच घटना तयार करण्याला प्राधान्यक्रम दिला होता. सैफने लिबयाच्या तेल साठ्यावरील नियंत्रण सैल केलं होतं आणि पाश्चिमात्य गुंतवणुकीचे स्वागत केलं होतं. आंतराष्ट्रीय स्तरावर वाळीत टाकलेल्या लिबयाला जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. अर्थात उदारमतवादी अशी प्रतिमा तयार करण्यात यश आलेल्या सैफने देशात गडाफींच्या सत्तेविरोधात आंदोलन उभ राहिल्यानंतर ते दडपण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले.

First Published: Saturday, November 19, 2011, 14:18


comments powered by Disqus