हिमकडा कोसळून पाकचे १३० जवान ठार - Marathi News 24taas.com

हिमकडा कोसळून पाकचे १३० जवान ठार

www.24taas.com, इस्लामाबाद
 
सियाचिन खोऱ्यात हिमकडा कोसळून पाकिस्तानचे सुमारे  १३० जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास  भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असलेल्या  खोऱ्यात घडली.
 
 
सियाचिन खोऱ्यात भारत आणि पाकिस्तानचे हजारो जवान तैनात आहेत.सियाचिन येथील सैन्याच्या मुख्यालयावर सकाळी सहाच्या सुमारास हिमकडा कोसळली. सैन्याचे १०० जवान आणि इतर कर्मचारी हिमकडेच्या ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे वृत्त आहे.
 
 
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गायत्री जिल्ह्यातील पाकिस्तानी बटालीयनवर हिमकडा कोसळली आहे. यासंदर्भात पाकिस्तानी सैन्याने अद्याप कोणतेही अधिकृत वक्‍तव्य दिलेले नाही. याबाबत पाकिस्तानचे मेजर जनरल अथर अब्बास म्हणाले, की  बचाव दलाला पाचारण करण्यात आले असून दलाचे जवान अद्याप घटनास्थळी पोचलेले नाही.

First Published: Saturday, April 7, 2012, 20:51


comments powered by Disqus