'झरदारी' येतायेत... पंतप्रधानांच्या 'दारी' - Marathi News 24taas.com

'झरदारी' येतायेत... पंतप्रधानांच्या 'दारी'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी रविवारी भारतभेटीवर येणार आहेत. ते  पंतप्रधान मनमोह सिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मुंबई हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी हाफीज याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता कमी आहे. या भेटीवेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित  राहणार आहेत.
 
झरदारींच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या लंचला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी, गृहमंत्री पी. चिदंबरम, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी, ससंदीय कार्यमंत्री पवन बन्सल यांच्यासह काही केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, तसंच भाजप नेते लालकृष्ण अडवाणीही या लंचला उपस्थित राहणार आहेत.
 
त्याचबरोबर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आपला मुलगा बिलावल भुट्टो आणि २ मुलींसह, ४० मंत्री त्यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे झरदारी यांची भारतभेट  लक्षवेधी ठरणार आहे.
 
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 8, 2012, 11:42


comments powered by Disqus