झरदारींनी सईदवर कारवाई करावी- पीएम - Marathi News 24taas.com

झरदारींनी सईदवर कारवाई करावी- पीएम

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भारत दौऱ्यावर आलेले पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात चाळीस मिनिटे चर्चा झाली. आता लवकरच दोन्ही देशांचे गृहसचिव चर्चा करतील.
 
झरदारी यांच्या बरोबरच्या चर्चेत पंतप्रधानांनी हाफिज सईदचा मुद्दा उपस्थित केला. याखेरीज व्हिसा नियम अधिक सुलभ करण्याबाबतची चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी सांगितलं. त्यानंतर  पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी दिल्लीहून जयपूरला रवाना झाले आहेत. जयपूरहुन ते अजमेरला जातील.
 
झरदारी यांच्या बरोबर संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल हेही आहेत. बन्सल पंतप्रधानांच्यावतीने दर्ग्यावर चादर अर्पण करतील. त्यापुर्वी झरदारी यांनी मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
 
 
 
 

First Published: Sunday, April 8, 2012, 15:16


comments powered by Disqus