Last Updated: Sunday, April 8, 2012, 15:34
www.24taas.com, नवी दिल्ली 
भारत भेटीवर आलेले पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी तसंच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात चर्चा झाली. मैत्रीपूर्ण वातावरणात ही चर्चा झाल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
चर्चा सकारात्मक झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. दोन्ही देशांना सौहार्दाचे संबंध हवे असल्याचं झरदारी यांनी सांगितलं. मनमोहन सिंग यांना पाकिस्तान भेटीचे आमंत्रण झरदारी यांनी दिले.
त्यापुर्वी संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी झरदारींचे विमानतळावर स्वागत केलं. झरदारी यांच्यासह त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो, मुलगी आसिफा भुट्टो, पाकचे गृहमंत्री रेहमान मलिक यांच्यासह ४० जण भारत भेटीवर आले आहेत. त्यामुळे आता झरदारी यांचं निमंत्रण पंतप्रधान स्विकारणार की निमंत्रण धुडकावणार ह्याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे...
First Published: Sunday, April 8, 2012, 15:34