इजिप्तमध्ये पोलीस संर्घषात ११ ठार - Marathi News 24taas.com

इजिप्तमध्ये पोलीस संर्घषात ११ ठार

झी २४ तास वेब टीम, कैरो 
 
इजिप्तमध्ये नागरिक आणि पोलीस यांच्यात झालेल्या संर्घषात ११ आंदोलक ठार झालेत. नागरिकांचा संर्घष वाढल्याने हुस्नी मुबारक यांची सत्ता गेल्यानंतर आता होणाऱया निवडणुका संकटात आहेत.
 
इजिप्तमधील लष्करी राजवट हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.लष्करी राजवट हटवून लोकशाहीची मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेत.यावेळी पोलिसांनी लोकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस यांच्यात झालेल्या संर्घषात ११ आंदोलक ठार झालेत.
 
लोकशाहीची मागणीसाठी लोक दोन दिवसांपासून आंदोलन करीत होते.शुक्रवारी लष्करी राजवटीच्या विरोधात रॅलीही काढली होती.

First Published: Monday, November 21, 2011, 05:52


comments powered by Disqus