हिना रब्बानींची मंत्रीपदावरून हकालपट्टी? - Marathi News 24taas.com

हिना रब्बानींची मंत्रीपदावरून हकालपट्टी?

www.24taas.com, इस्लामाबाद
 
परस्परविरोधी वक्तव्य करणाऱ्या विदेश मंत्री हिना रब्बानी खार यांना दुसऱ्या विभागात पाठवून देण्याचा विचार राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी करत आहेत. अमेरिकन दुतावासाशी चर्चा करत असताना पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांच्या बोलण्यातून हा विचार डोकावला.
 
पाकिस्तानी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी केलेल्या वक्तव्यावरून हिना रब्बानी यांना विदेश मंत्रीपदावरून काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. गिलानी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते, “भारताशी काश्मिर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ‘फ्रेश टीम’ची गरज आहे.” या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, पण ‘फ्रेश टीम’ म्हणजे गिलानींना नेमकं काय अपेक्षित आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
 
चार एप्रिल रोजी हिना रब्बानी यांनी एका सार्वजनिक सभेत राष्ट्रपती झरदारी यांच्या वक्तव्याचा विरोधाभास निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. यामुळे अमेरिकेचे उप सहाय्यक विदेश मंत्री थॉमस नाइड्सदेखील हैराण झाले होते, असं सांगण्यात येत आहे. याच कारणांमुळे हिना रब्बानी यांना पदावरून काढण्यात येण्याची शक्यता आहे.

First Published: Tuesday, April 10, 2012, 17:14


comments powered by Disqus