इंटरनेटवर पॉर्नही तो जादा बिकता है! - Marathi News 24taas.com

इंटरनेटवर पॉर्नही तो जादा बिकता है!

www.24taas.com, लंडन
 
कोणत्याही सार्वजनिक साइटवर कमी कपड्यातील स्त्रिया पाहिल्यावर आरडाओरड करणारे मात्र इंटरनेटवर सफर करताना सर्वाधिक सर्च पोर्नोग्राफी करतात हे एका संशोधनातून समोर आले आहे. एकूण सर्चच्या ३० टक्के वाटा हा एकट्या एका पोर्नोग्राफी साइटने बळकावला आहे, हा फेसबुक आणि गुगलपेक्षाही अधिक असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.
 
 
जगातील सर्वात मोठ्या एका पॉर्न साइटला ४.४ अब्ज पेजव्ह्यूस मिळाले असून ३५ कोटी नवे व्हिजिटर्स नव्याने या साइटला भेट देत असल्याची माहिती एक्सट्रीम टेक या वेबसाइटने दिली आहे.
 
 
या साईटने गुगल आणि फेसबुकचेही रेकॉर्ड तोडले आहे.  साधारणतः या वेबसाइटवर एक प्रेक्षक १५ मिनिटे असतो. दर महिन्याला २९ पेन्टाबाइट कामोत्तेजक साहित्य इंटरनेटवरून प्रदर्शित होत असते. एका प्रसिद्ध साइटवर या क्षणी १०० टेराबाइट एवढे कामोत्तेजक साहित्य आहे. त्या साइटला दररोज १० कोटी लोक भेट देतात आणि त्यावरून दररोज ९५० टेराबाइट साहित्य प्रदर्शित होते.
पण या हॉट साइटचा वापर काही वेळा ग्राहकांना फसवण्यासाठीही होतो. विशेषतः जेथे पासवर्ड वगैरे विचारला जातो, तेथे हे पासवर्ड हॅक होण्याच्या घटना वाढत आहेत. ई-मेल पत्ते विचारले जातात, तेव्हा त्याचा वापर व्यावसायिक कामांसाठी केला जातो. यामुळे या हॉट साइटमध्येही फसवणूकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत.

First Published: Tuesday, April 10, 2012, 20:21


comments powered by Disqus