अफगाणिस्तानमध्ये बॉम्बहल्ला, ९ ठार - Marathi News 24taas.com

अफगाणिस्तानमध्ये बॉम्बहल्ला, ९ ठार

www.24taas.com, हेरत
 
अफगाणिस्तानातल्या हेरत प्रांतात झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात नऊ जण ठार झाले आहेत. यात तीन पोलिसांचा समावेश आहे. इराणच्या सीमेलगत असलेल्या भागात हा हल्ला झाला आहे.
 
एका कारमध्ये हा बॉम्ब ठेवून त्याचा स्फोट घडवण्यात आला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र त्यांची निश्चीत संख्या अजून कळू शकलेली नाही. अफगाणिस्तानमधल्या तालिबानींचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेनं इथं सैन्य पाठवलं आहे.
 
त्याला नाटोचीही मदत लाभलेली आहे. मात्र तालिबानींचा अजूनही काही भागांमध्ये प्रभाव आहे. वारंवार ते त्यांची ताकद अमेरिका आणि नाटोच्य सैन्याला दाखवून देत असतात. मात्र यात हकनाक बळी जातो तो, सामान्य नागरिकांचाच.
 
 

First Published: Tuesday, April 10, 2012, 21:01


comments powered by Disqus