इंडोनेशियात भूकंप, भारताला त्सुनामी धोका - Marathi News 24taas.com

इंडोनेशियात भूकंप, भारताला त्सुनामी धोका

www.24taas.com,इंडोनेशिया
 
 
शक्तिशाली भूकंपाने आज इंडोनेशिया जोरदार हादरा दिला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ८.९ इतकी नोंदविण्यात आली. मुंबईसह भारताचा विविध भागात  भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने त्सुनामी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील जवळील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
 
मुंबईखेरीज  कोलकाता, बंगळुरू, आसाम, चेन्नई, बिहार या ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणावले.  इंडोनेशियात जोरदार हादरा बसल्याने नागरिकांची पळापळ झाली. काही ठिकाणी पडझडही झाल्याचेही वृत्त आहे.  या शक्तिशाली भूकंपामुळे एकूण  २८ देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात  आला आहे.
 
 
मुंबईही हादरली!

मुंबईत या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४  इतकी नोंदविण्यात आली.  आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी मुंबईत माहिम, ऑपेरा हाऊस परिसरात तीन सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवणे. मुंबईपासून १५६ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणे असून अद्यापि नेमकं ठिकाणं कोणतं होतं याची माहिती हाती आलेली नाही.
 
 
मुंबईत वांद्रे पूर्व भागात काही कार्यालयांमध्‍ये धक्‍के जाणवल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. मुंबईमध्‍ये भूकंपाचे धक्‍के जाणवले नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर भूकंपाची शक्‍यता पडताळून पाहायला हवी, असे भूगर्भशास्‍त्रज्ञांनी म्‍हटले आहे.
 
 
जगात कोठे हादरे बसले?
इंडोनिशिया, भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, थायलंड, मालदीव, ब्रिटन, मलेशिया, रंगून, मॉरिशस, पाकिस्तान, सोमालिया, ओमान, इराण, यूएई, यमेन, बांग्लादेश, तांझानिया, मोझाम्बिक, केनया, क्रुझेट आयर्लंड, दक्षिण आफ्रिका सिंगापूर या देशांना त्सुनामीचा धोका पोहचू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
 
इंडोनेशियात मंगळवारी रात्री तीव्र व शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे बुधवारी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.  देशाच्या उत्तरी भागातील आचे प्रांतात रात्री दीड वाजता समुद्राच्या तळाशी ७.६ रिस्टर स्केलचा धक्का जाणवला. २००४ साली हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीमुळे आचे भागात १ लाख ७० हजार लोक मारले गेले होते. तर, संपूर्ण इंडोनेशियात त्सुनामीमुळे किमान २ लाख ३० हजार लोक मारले गेले होते.
 
 
 
 
 

First Published: Wednesday, April 11, 2012, 15:42


comments powered by Disqus