भूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता - Marathi News 24taas.com

भूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता

www.24taas.com, मुंबई 
 
इंडोनेशियामध्ये ८.७ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे. हा धक्का पश्चिमी किनाऱ्यांना बसलेल्या धक्यांपैकी सगळ्यात मोठा धक्का आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू या पूर्व किनारी शहरांनादेखील या भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले.
 
या भकंपाचं केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून ३३ किमी खोल आहे. इंडोनेशियाच्या बांडा असेह या प्रांतापासून ४९५ किमी तर मलेशियाची राजधानी असणाऱ्या क्वालालंपूरपासून ९६२ किमीवर आहे. भारतासह २८ देशांना त्सुनामीची सूचना देण्यात आली आहे. इंडोनिशिया, भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, थायलंड, मालदीव, ब्रिटन, मलेशिया, रंगून, मॉरिशस, पाकिस्तान, सोमालिया, ओमान, इराण, यूएई, यमेन, बांग्लादेश, तांझानिया, मोझाम्बिक, केनया, क्रुझेट आयर्लंड, दक्षिण आफ्रिका सिंगापूर यांसारख्या २८ देशांना त्सुनामीचा धोका पोहचू शकतो अशी सूचना ‘द पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर’ने दिली आहे.
 
जागतिक वेळेनुसार ९.३० वाजता इंडोनेशियातील बांडा असेह प्रांतात त्सुनामी येऊ शकते, अशी शक्यता वॉर्निंग सेंटरने वर्तवली आहे. इंडोनेशियाच्या या प्रांतात बहुतेकवेळा भूकंपाचे हादरे बसत असतात. २००४ साली झालेल्या भूकंपामध्ये या प्रांतातील १,७०,००० लोकांचा मृत्यू झाला होता. यावेळी भूकंपाच्या हादऱ्यांची तीव्रता जास्त असल्यामुळे येणाऱ्या त्सुनामीचा फटका मोठ्या प्रमाणावर जगाला बसण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरातही  त्सुनामी येण्याची शक्यता आहे.
 
 

First Published: Wednesday, April 11, 2012, 15:42


comments powered by Disqus