Last Updated: Wednesday, April 11, 2012, 17:20
www.24taas.com, चेन्नई 
इंडोनेशियात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुसरा भूकंप 8.1 रिश्टर स्केल इतका मोजला गेला आहे. तसंच भारतातील चेन्नई, गुवाहाटी मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
शक्तिशाली भूकंपाने आज इंडोनेशियाला जोरदार हादरा दिला. रिश्टर स्केलवर पहिल्या भूकंपाची तीव्रता ८.९ इतकी नोंदविण्यात आली. मुंबईसह भारताचा विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाने त्सुनामी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील जवळील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईखेरीज कोलकाता, बंगळुरू, आसाम, चेन्नई, बिहार या ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणावले. इंडोनेशियात जोरदार हादरा बसल्याने नागरिकांची पळापळ झाली. काही ठिकाणी पडझडही झाल्याचेही वृत्त होते. या शक्तिशाली भूकंपामुळे एकूण २८ देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
First Published: Wednesday, April 11, 2012, 17:20