Last Updated: Friday, April 13, 2012, 14:06
www.24taas.com,प्योंग्यांग उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केले खरे मात्र, काही कालावधीच ते कोसळले. या रॉकेटचे अवशेष समुद्रात सापडले आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाची मोहीम फसली आहे. हे रॉकेट कोसळ्याची माहीती उ. कोरियाच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उत्तर कोरियाचे आज शुक्रवारी लांब पल्ल्याचे रॉकेट आकाशात झपावले. या अशस्वी रॉकेट लाँचनंतर उत्तर कोरियाची ताकद अधिक मजबूत झाली आहे. नव्या क्षेपणास्त्र मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर कोरियाची दखल घ्यावी लागणार आहे, अशी प्रक्रिया व्यक्त होत होती. मात्र, काही अवधितच रॉकेट समुद्रात कोसळ्याने कोट्यवधी रूपये पाण्यात गेले आहेत.
या मोहिमेच्या स्वरूपातून उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने नोंदविले. पश्चिम समुद्र किनाऱ्यालगतच्या तळावरून सकाळी सात वाजून ३९ मिनिटांनी रॉकेट सोडण्यात आले. मात्र, उत्तर कोरियाकडून त्याबाबतचे कोणतेही सुतोवाच करण्यात आलेले नाही.
जरी उत्तर कोरियाने रॉकेट लाँच केले तरी त्याचा गाजावाजा केलेला नाही. रॉकेट लाँच केल्याचे आम्ही लवकरच जाहीर करू, असे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राष्ट्रीय संस्थापक किम इल सुंग यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त येत्या रविवारी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमादरम्यान या रॉकेटच्या प्रक्षेपणाबाबत आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. यावर आता विरजन पडले आहे.
First Published: Friday, April 13, 2012, 14:06