इजिप्तमध्ये २०१२मध्ये निवडणूक! - Marathi News 24taas.com

इजिप्तमध्ये २०१२मध्ये निवडणूक!

झी २४ तास वेब टीम, कैरो 
 
इजिप्तमध्ये लोकशाही बदलाच्या मागणीसाठी  आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर येत्या जुलै २०१२मध्ये निवडणूक घेण्यात येतील, असे इजिप्तच्या सत्ताधीशांनी जाहीर केले आहे.
 
लोकशाही बदलाच्या मागणीसाठी कैरोतील ताहरीर चौकात  आंदोलन सुरू आहे.  देशाच्या हंगामी मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. पंतप्रधान एसाम शरफ यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाने सशस्त्र दलांच्या सर्वोच्च समितीकडे राजीनामा सादर केला आहे, असे मंत्रिमंडळाचे प्रवक्ते महंमद हेगाझी यांनी सांगितले आहे. इजिप्तच्या अधिकृत एका वृत्तसंस्थेने हे वृत्त प्रसारित केले आहे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असल्यामुळे, राजीनामा मंजूर होईपर्यंत विद्यमान मंत्रिमंडळच देशाचा कारभार पाहणार आहे.
 
आंदोलकांना पळऊन लावण्यासाठी पोलीस आणि सैनिकांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यामुळे आंदोलक बिथरले आहेत. या आंदोलनात ३६ जणांचा मृत्यू झाला. तर १९०० पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत.
 
 

First Published: Wednesday, November 23, 2011, 09:36


comments powered by Disqus