Last Updated: Tuesday, April 17, 2012, 17:22
www.24taas.com,वॉशिंग्टन दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हल्ला केल्याने याची दखल अमेरिकेने घेतली आहे. याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. त्यावेळी काबूल हल्लाबाबत बोलणी केलीत.
काबूल या राजधानीवर झालेला दहशतवादी हल्लानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर काही परिणाम होईल का, याची चाचपणी अमेरिकेने घेतली. अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये मैत्रिकायम असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले, अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांवरील संसदीय आढाव्याच्या निष्कर्षावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संसदीय आढाव्याचा निष्कर्ष हा पाकिस्तानसाठी खडतर रस्ता आहे. याप्रकरणी लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या सरकारने पुढाकार घेतला आहे. यावरून पाकिस्तानातील घटनात्मक स्तंभांची ताकद अधोरेखित होते.
First Published: Tuesday, April 17, 2012, 17:22