रोमनींची भाषा, "ओबामा गुंडाळा गाशा" - Marathi News 24taas.com

रोमनींची भाषा, "ओबामा गुंडाळा गाशा"

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी शर्यतीत असणाऱ्या रोमनींनी आज बराक ओबामा यांना आपला गाशा गुंडाळण्यास सुरूवात करा, असं सांगितलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपणच विजयी होऊ, असा रोमनी यांना विश्वास आहे.
 
“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना तुम्ही काय संदेश द्याल?” असा प्रश्न एका वृत्तवाहिनीने विचारला असता, ६५ वर्षीय रोमनी यांनी उत्तर दिलं, “आता आपला गाशा गुंडाळायला सुरूवात करा, एवढंच मी त्यांना आता सांगेन” आपल्या यशाबद्दल पूर्ण खात्री असलेल्या रोमनी यांनी ओबामांबद्दल बोलताना म्हटले, की ओबामांना अजूनही ४ वर्षं राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा असेल. पण त्यांच्या धोरणांचा अमेरिकेला काडीचाही फायदा झालेला नाही.
 
ओबामांच्या प्रशासनात बेकारी वाढली. उत्पन्न वाढू शकलं नाही, उलट खर्व रुपयांचं कर्जच अमेरिकेवर लादलं गेलं. ओबामा अमेरिकेला चुकीच्या दिशेला घेऊन जात असल्याचा आरोपही रोमनी यांनी केला आहे. केवळ रोमनी यांनीच नव्हे, तर रोमनी यांच्या पत्नीने देखील ओबामांना संदेश दिला आहे, की आता खुर्ची सोडा, कारण आता आमची पाळी आली आहे.

First Published: Tuesday, April 17, 2012, 17:47


comments powered by Disqus