Last Updated: Tuesday, April 24, 2012, 13:17
www.24taas.com, नॉर्वे 
नॉर्वेत डांबून ठेवण्यात आलेल्या दोन मुलांची अखेर सुटका झाली आहे. अभिग्यान आणि ऐश्वर्या अशी सुटका झालेल्या मुलांची नावं आहेत. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर त्यांचं आगमन झालं.
काकांच्या ताब्यात असलेल्या या मुलांच्या सुटकेबाबत परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी समाधान व्यक्त केलं असून नॉर्वे सरकारचे आभारही मानले आहेत. अभिग्यान आणि ऐश्वर्या यांच्या सुटकेची लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यांना भारतात पाठवण्यात यावं यासाठी भारतानं कायदेशीर लढाईबरोबर भारतानं नॉर्वे सरकारवर राजकीय दबावही टाकला होता.
अखेर नॉर्वे सरकारनं दोन्ही मुलांची सुटका करत त्यांना भारतात पाठवलं आहे. त्यामुळे या मुलांच्या नातेवाईकांच्या आनंद ओसंडून वाहतो आहे. उद्या ही दोन्ही मुलं कोलकात्यात आजी आजोबांकडे पाठवण्यात येणार आहेत.
First Published: Tuesday, April 24, 2012, 13:17