नरेंद्र मोदींना व्हीसा नाही - अमेरिका - Marathi News 24taas.com

नरेंद्र मोदींना व्हीसा नाही - अमेरिका

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
 
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्याच्या धोरणात कोणताही बदल करण्यास, अमेरिकेच्या प्रशासनानं नकार दिला आहे. अमेरिकी संसद सदस्य जो वाल्श यांच्या विनंतीपत्रावर स्पष्टीकरण देताना, मोदींना व्हीसा देण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केले आहे.
 
 
वाल्श यांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अमेरिकन मुस्लीम समुदायानं मोदींना व्हिसा देवू नये, अशी विनंती प्रशासनाला केली होती. मोदींना व्हिसा नाकारण्याचा निर्णय २००५ साली घेण्यात आला होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्‍यास अमे‍रिकेने स्पष्‍ट नकार दिला आहे. परराष्‍ट्र खात्याच्या प्रवक्त्या विक्टोरिया न्यूलँड यांनी ही माहिती दिली. मोदींच्या व्हिसाबाबत धोरणांमध्ये कोणत्याही परिस्थिती बदल करता येणार नाही.
मोदी यांना व्हिसा देण्‍यात यावा, अशी मागणी अमेरिकेतील खासदार ज्यो वॉल्श यांनी केली होती. यासाठी वॉल्श यांनी परराष्‍ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन यांना पत्रही लिहिले होते. मोदी यांना व्हिसा देण्याची मागणी तथ्यहीन असल्याचे इंडियन अमेरिकन मुस्लिम समुदायाने म्हटले आहे. तर खासदार वॉल्श यांनी कायदाच्या अभ्यास करावा, अशी टीका आयएएमसीचे अध्यक्ष शाहीन खातिब यांनी केली आहे. गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर मोदी यांचा  व्हिसा यापूर्वीही नाकारला होता.

First Published: Thursday, April 26, 2012, 14:06


comments powered by Disqus