Last Updated: Saturday, April 28, 2012, 16:20
www.24taas.com,वॉशिंग्टन पाकिस्तानेच पंतप्रधान युसुफ रजा गिलानीच आहेत. त्यांच्याबरोबर आमचे काम सुरू आहे. कारण ते लोकशाहीप्रणीत सरकारचे ते प्रमुख आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
विदेश कार्यालयच्या प्रवक्त्या विक्टोरिया न्यूलेंड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, न्यायालयाचा निकाल आला आहे. गिलानी यांना ३० सेकंदाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. असे असले तरी गिलानी हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.
पाकिस्तान आणि अफगानिस्तानचे विशेष प्रतिनिधी ग्रॉसमैन यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना सांगितले, गिलानी यांच्यासोबत आमचे काम सुरू आहे. पाकबरोबरचे संबंध चांगले निर्माण होण्यासाठी आमची बोलणी सुरू आहेत. आमच्या कोर समितीची बैठक झाली. त्यानुसार तालिबानबाबत अजूनही फैसला झालेला नाही.
First Published: Saturday, April 28, 2012, 16:20