Last Updated: Sunday, April 29, 2012, 23:44
www.24taas.com, लंडन मूळ भारतीय वंशाचे असणारे लक्ष्मी निवास मित्तल आणि त्यांचं कुटुंब सलग सातव्या वर्षी ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत कुटुंब ठरलं आहे.
संडे टाइम्स दरवर्षी ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत लोकांची यादी प्रकाशित करतं. या यादीत ६१ वर्षीय लक्ष्मी निवास मित्तल यांचं नाव अव्वल स्थानावर आहे. खरं तर मित्तल कुटुंबाची संपत्ती यावर्षी ४८१.४ कोटी पौंडांनी कमी झाली आहे. तरीही मित्तल यांच्याकडे १२.७ अब्ज पौंड एवढी आहे. त्यामुळे याही वर्षी मित्तलच ब्रिटनमधील सगळ्यांत श्रीमंत कुटुंब ठरलं आहे.
रुसी लौह अयस्क उद्योगपती अलीशर उस्मानोव हे या यादीत द्विततीय क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती मित्तल यांच्यापेक्षा थोडीशीच कमी भरते. १२.३ अब्ज एवढी त्यांची संपत्ती आहे.याशिवाय चौथ्या क्रमांकावरही श्रीचंद हिंदुजा आणि गोपीचंद हिंदुजा हे भारतीय वंशाचेच उद्योगपती आहेत. यांची संपत्ती ८.६ अब्ज पौंड एवढी आहे.
First Published: Sunday, April 29, 2012, 23:44