Last Updated: Tuesday, February 19, 2013, 16:29
www.24taas.com,लंडन डॉक्टरांनी कमाल केली. बालकालाच चार दिवस गोठवून ठेवले. त्यानंतर चमत्कार झाला. हृदयविकारग्रस्त बालकाचे शरीर तब्बल चार दिवस गोठवून ठेवून त्याचा जीव वाचविण्यात यश मिळविले आहे.
गेल्याच आठवड्यात एका बालकाचा जन्म झाला. मात्र, त्याच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. त्याच्या हृदयाचे प्रतिमिनिटाला ३००हून अधिक ठोके पडत असल्यामुळे ते वाचणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचे शरीरच गोठवून टाकले.
एडवर्ड आईव्हीस या हृदयविकारग्रस्त बालकाचे शरीर चार दिवस गोठवून ठेवून त्याचा जीव वाचविण्याची करामत डॉक्टरांच्या या नवीन तंत्रामुळे शक्य झाली.या बालकाला जन्मजात सुप्रा व्हेंट्रीकोलर टॅचीकार्डिया हा हृदयविकार होता. त्याच्या हृदयाचे प्रतिमिनिटाला ३००हून अधिक ठोके पडत होते.
हे बालक जगण्याची शक्यता कमी असल्याने या बालकाला डॉक्टरांनी कोल्ड जेलच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळले. त्यामुळे शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअसवरून ३३.३ डिग्री सेल्सिअस इतके झाले आणि तीव्र रक्तदाबामुळे शरीरातील अवयवाची होणारी हानी टळली. मात्र त्याचे शरीर गोठविल्याने बालकाला डेफीब्रीलीटेरच्या सहाय्याने शॉक दिला. त्यानंतर चौथ्या दिवशी त्याच्या हृदयाचे ठोके स्थिर होऊन प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर महिन्याने एडवर्डला घरी सोडण्यात आले.
First Published: Tuesday, February 19, 2013, 16:11