...ही आहे एका राजपुत्राची हिऱ्यांची कार!, the diamond-studded Mercedes Benz of Prince Alwaleed Bin Talal

...या कारला स्पर्श करण्यासाठी मोजा ६५ हजार रुपये!

...या कारला स्पर्श करण्यासाठी मोजा ६५ हजार रुपये!
www.24taas.com, वृत्तसंस्था, दुबई

ही एक अशी कार आहे जी पाहिल्यावर तुमच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. कारण, ही संपूर्ण कार हिऱ्यांनी सजवली गेलीय.

ही हिरेजडित कार पाहून तुम्हालाही ती खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. मात्र, ती कार खरेदी करणं तर दूरच पण तिला स्पर्श करण्याचा नादही तुम्हाला महाग पडू शकतो. कारण या कारला एकदा स्पर्श करण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील तब्बल ६५ हजार रुपये.

लिमिटेड एडिशनच्या मर्सिडीज बेंझ कार पूर्णपणे हिऱ्यांनी सजवलेली आहे.. या हिरेजडित कारची किंमत आहे ३२ कोटी रुपये. मर्सिडीजने आपल्या ५० व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत ही हिरेजडित कार लॉन्च केली. यापैंकी एक कार सौदी अरबचा राजपुत्र अल-वलीद बिन तलालनं खरेदी केलीय.
मात्र मर्सिडीज कंपनीनं कधी कल्पनाही केली नसेल की अरब राजपुत्र या कारला स्पर्श करण्याची फी ६५ हजार रुपये असेल... हि-यांची चमक बाजूला ठेवली तर इतर कोणत्याही कारप्रमाणे ही कार रस्त्यावर धावू शकते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



पाहा व्हि़डिओ

First Published: Wednesday, September 25, 2013, 10:53


comments powered by Disqus