विकी डोनर, १५ मुलांचा बाप, The Virgin Father, sparm doners

विकी डोनर, १५ मुलांचा बाप

विकी डोनर, १५ मुलांचा बाप
www.24taas.com,न्यूयॉर्क

तुम्ही `विकी डोनर` हा सिनेमा पाहिलाय. या चित्रपटाची थिम वास्तव जीवनात पाहायला मिळालीय. `विकी डोनर` चित्रपटातील शुक्राणू दान करण्याच्या संकल्पनेने तरुणाईला चांगलेच पछाडलेले आहे. यामुळे शुक्राणू दात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे; तीच परिस्थिती श्रीमंत गणल्या गेलेल्या अमेरिकेत एकाने चक्क शुक्राणू दान केले आहेत. आपण १५ मुलांचा बाप झाल्याचे स्पम डोनरने म्हटलेय.

शुक्राणू दानामुळे एका नव्या जीवाचे सृजन होते. तरुणाईने समाजसेवा म्हणून याकडे बघितल्यास अनेकांच्या आयुष्यातील वाळवंटातही हिरवळ निर्माण होण्याची शक्याता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत सामाजिक कार्यकर्ते करताना दिसतात.

अमेरिकेतील एका ३६ वर्षीय पुरुष विवाह न करता आणि कोणत्याही महिलेसोबत संबंधही न ठेवता चक्क १५ मुलांचा बाप झाला आहे. ही घटना धक्कादायक असली तरी ती खरी आहे. ट्रेंट अर्सेनौल्ट यांने आतापर्यंत आपले स्पम दान केले आहेत. त्यातून १५ मुले झाल्याचा दावा त्याने केला आहे.

ट्रेंटने अद्याप लग्न केले नसून एखाद्या महिलेसोबत त्याचे संबंधही नाहीत. परंतु, तरीही तो चक्क १५ मुलांचा बाप झाला आहे. मुले होत नसलेल्या दांपत्यांना ट्रेंट आपले शुक्राणू दान करतो. आतापर्यंत दान केलेल्या शुक्राणूंमुळे १५ मुले जन्माला आल्याचे ट्रेंटने म्हटलेय. आतापर्यंत अनेक दांपत्यांनी त्याच्याकडून शुक्राणू घेतले आहेत.

First Published: Sunday, March 3, 2013, 15:08


comments powered by Disqus