Last Updated: Friday, April 25, 2014, 20:37
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनअडेल थेरन लग्नानंतरही पती ब्रुससह अत्यंत खूश होती. ती आपल्या पतीवर पूर्ण विश्वास करत होती. त्यामुळे ती आपल्या मैत्रीणींनाही घरी बोलत होती. पण तिला माहीत नव्हतं तिच्या पाठीत तिचा पती कशा प्रकारे खंजीर खुपत होता. ब्रुसचे अडेलच्या मैत्रिणींशी अफेअर सुरू झाले. एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा मैत्रिणींना तो फिरवत होता.
बऱ्याच दिवसांपर्यंत ही गोष्ट पत्नीपासून लपून राहिली. पण एक दिवस तिच्या जवळच्या मैत्रिणीशी बोलण्यानंतर तिला संशय आला. तिने शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि ती चक्रावून गेली. पतीचे तिच्या सहा मैत्रिणींसोबत अफेअर सुरू असून त्याने आपल्या जाळ्यात त्यांना अडकवले आहे. तसेच मैत्रिणींनीही ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली होती.
हे प्रकरण इथेच थांबलं असतं तर तो ब्रूस कोणता. एक एक गोष्टी समोर येत होत्या तेव्हा भामट्या पतीची पोल खुलत होती. ब्रूसने त्या सहा महिलांनाच नाही तर आणखी १२ महिलासोबत अफेअर सुरू होते. प्रथम ही गोष्ट समोर आल्यावर पतीला घटस्फोट दिला पण नंतर सुखी राहण्यासाठी तिने पतीला माफ केले. हे प्रकरण अमेरिकेतील आहे.
पत्नी असताना १८ महिलांशी अफेअरची गोष्ट ऐकल्यावर अडेल पूर्णपणे तुटून गेली. तिने आपल्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. एका दिवशी ती आपल्या पतीपासून वेगळी झाली आणि मैत्रिणींशी नाते तोडले. पण एकटं राहणं अशक्य होतं. पतीही तिची माफी मागत होता. त्यानंतर या प्रकरणाला विसरून तिने पुन्हा नव्याने पतीसोबत संसार थाटला. तिने सांगितलं की भावुक आहे पण बावळट नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 25, 2014, 20:37