Last Updated: Tuesday, June 25, 2013, 13:33
www.24taas.com, झी मीडिया, इंग्लंड
तुम्हाला परदेश गमन करावयाचे असेल तर तुमच्या खिशात लाखो रूपये असायला पाहिजेत. कारण परदेशवारी करण्यासाठी किमान तीन लाख रूपये आधी मोजावे लागतील. युकेला जाण्यासाठी तशी अट घालण्यात आली आहे. अनामत रक्कम ठेवल्यानंतर लंडनमध्ये तुम्हाला पाय ठेवता येतील..अन्यथा नाही.
भारत, पाकिस्तान, नायजेरिया आणि इतर आशियाई व आफ्रिकन देशांतून होणारे अतिरिक्त स्थलांतर रोखण्यासाठी ब्रिटिश सरकारने नामी शक्कल लढवली आहे. नोव्हेंबरपासून किमान सहा देशांतील पर्यटकांना ही योजना लागू करण्याचा विचार ब्रिटिश सरकार करत आहे, असे एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने म्हटलंय.
फिरण्यासाठी अथवा कामानिमित्त ‘युके‘ला जाऊन येण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र इच्छा पुरी होण्यासाठी २ लाख ७५ हजार रूपये एवढी अनामत रक्कम ठेवावी लागेल.सहा महिन्यांच्या पर्यटक व्हिसावर इंग्लंडला जाणाऱ्या अठरा वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या पर्यटकांना तीन हजार पौंड म्हणजेच सुमारे पावणेतीन लाख रुपये भरण्याची सक्ती करण्यात येणार आहे.
इंग्लंडमध्ये तुम्ही फिरण्यास अगर राहण्यास गेलात तर त्याठिकाणी जास्तीत जास्त पाच महिने राहता येईल. जर पर्यटक सहा महिन्यांच्या मुदतीहून अधिक काळ इंग्लंडमध्ये राहिल्यास दंड म्हणून त्यांची अनामत जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशवारी तुमच्यासाठी धोकाचा सूचना असल्याचे दिसत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 13:33