बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीनं घेतली `डॉन`ची भेट , top bollywood actress meet dawood ibrahim

धक्कादायक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अन् `डॉन`ची भेट!

<B> <font color=red>धक्कादायक </font></b> बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अन् `डॉन`ची भेट!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मोदींच्या शपथविधीनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आपला तळ हलवल्याचं नुकतीच चर्चा सुरु होती... पण, याच ‘वॉन्टेड’ दाऊदची बॉलिवूडच्या एका टॉप अभिनेत्रीनं भेट घेतल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.

एका परदेशी मॅगझिननं दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडच्या एका टॉपच्या अभिनेत्रीनं दाऊदची भेट घेऊन त्याला आपल्या एका सिनेमात पैसे गुंतवण्याची विनंती केलीय. हा सिनेमाचं शुटींग मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे. या सिनेमात हॉलिवूडचा एक सुपरस्टारही दिसणार आहे. इंग्रजीसोबत हा सिनेमा हिंदीतही बनविण्यात येणार आहे, असं समजतंय. एका अभिनेत्रीनं गुपचूप दाऊदची भेट घेतली त्यावेळी दाऊदचा एक मित्रही यावेळी तिथं उपस्थित होता.

या अभिनेत्रीचं नाव सरळ सरळ जाहीर न करता या अभिनेत्रीनं गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळवल्याचं सांगण्यात येतंय. आपल्याच एका सहकलाकारासोबत तिच्या अफेअरची जोरदार चर्चाही आहे. ही अभिनेत्री भारतासोबतच परदेशांतही लोकप्रिय आहे. तिची बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडवर नजर आहे. तिची आणि डॉनची भेट नक्की कुठे झाली हे सांगणं मात्र कठिण आहे. भारतात ही भेट होणं शक्य नाही... आणि दाऊदला पाकिस्तानातून बाहेर निघणं कठिण आहे.

ही गोष्ट पोलिसांपर्यंतही पोहचलीय. परंतु, पोलिसांच्या समोर अजूनही काही प्रश्न कायम आहेत. सोबतच, ज्या अभिनेत्रीचं नाव घेतलं जातंय, ती असं करेल यावर विश्वास ठेवणं पोलिसांसाठीही कठिण आहे. पोलीस यावर लक्ष ठेऊन आहेत. पुरावा हाती लागताच ते याप्रकरणात कारवाई करू शकतील.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 30, 2014, 17:12


comments powered by Disqus