लाइव्ह फॅशन शोमध्ये टॉपलेस तरुणींचा धिंगाणा Topless femen girls in Fashion Show

लाइव्ह फॅशन शोमध्ये टॉपलेस तरुणींचा धिंगाणा

लाइव्ह फॅशन शोमध्ये टॉपलेस तरुणींचा धिंगाणा
www.24taas.com, झी मीडिया, बर्लिन

फॅशन शोमध्ये मॉडेल्सचे कपडे सुटून अचानक त्या टॉपलेस होण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा झाले आहेत. मात्र जर्मनी येथे टॉप मॉडेल्सच्या शोमध्ये अचानक फेमेन संस्थेच्या दोन तरुणींनी टॉपलेस येऊन निदर्शनं केली.

ज्यावेळी या तरुणी टॉपलेस होऊन रँपवर आल्या, त्यावेळी टॉप मॉडेल हेडी क्लम रँप वॉक करत होती. हा कार्यक्रम स्टेडियममध्ये सुरू होता. या कार्यक्रमाला तेथे १५,००० लोक उपस्थित होते. याशिवाय हा कार्यक्रम लाइव्ह सुरू असल्यामुळे टीव्हीवर लाखो लोक तो सहकुटुंब पाहात होते. अशावेळी अचानक रँपवर दोन तरुणी अर्धनग्नावस्थेत टॉपलेस होत रँपवर आल्या आणि फॅशन शोविरोधात दर्शनं केली.

टॉपलेस आलेल्या महिलांनी केवळ जीन्स घातली होती. त्यांचं फॅशन शोविरोधात हे आंदोलन होतं. जसं पुरुषांच्या समाजात वेश्यांना देहविक्री करावा लागतो, तसंच मॉडेलिंगधून स्त्रियांच्या शरीरांचा व्यापार केला जातो, असं या निदर्शन करणाऱ्या टॉपलेस तरुणींचं म्हणणं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 2, 2013, 19:42


comments powered by Disqus