कासवाचे चुंबन घेणे त्याला पडले महागात, Tortoise Kiss than man admitted to hospital

कासवाचे चुंबन घेणे त्याला पडले महागात

कासवाचे चुंबन घेणे त्याला पडले महागात
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग

एक नागरिक कासवाच्या प्रेमात पडला. त्याने कासवावरील प्रेमापोटी त्याचे चुंबन घेतले. मात्र, त्या नागरिकाला कासवाचे चुंबन महागात पडले आहे. कासवाने त्याचा बाईट घेतल्याने त्या नागरिकालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

कासवाचे चुंबन घेत असताना कासवाने ओठाचा चावा घेतला. यात नो नागरिक जखमी झाला. फुजान प्रांतामध्ये एक प्राणीमित्र संघटनेमधील नागरिक पकडलेल्या कासवांना सोडून देत होता. शेवटचे कासव सोडत असताना त्याने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कासवाने ओठ तोडून काढले. यावेळी जखमी झालेल्या नागरिकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका संकेतस्थळाने दिली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014, 22:04


comments powered by Disqus