Last Updated: Thursday, December 5, 2013, 11:10
www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना ठार मारणाऱ्याला दोन अब्ज रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. हे बक्षीस जाहीर केलंय पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील नेते अकबर बुगटी यांच्या मुलानं...
अकबर बुगटी यांच्या हत्येचा आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर आहे. त्यामुळंच त्यांच्या मुलानं हे बक्षीस जाहीर केलंय. ‘मुशर्रफ यांना मारणार्या ला २ अब्ज रुपये रोख आणि २०० एकरची शेतजमीन दिली जाईल’ अशी घोषणाही तलाल अकबर बुगटी यानं मंगळवारी रावळपिंडी इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
याआधी २०१० साली तलालनं मुशर्रफ यांना मारणार्यालला १ अब्ज रुपये रोख आणि १०० एकर जमीन बक्षीस जाहीर केले होते. आता त्यांनी बक्षिसाची किंमत दुप्पट केली आहे. २०१२ साली अकबर बुगटी यांच्या नातवानं देखील मुशर्रफ यांची हत्या करणार्या ला १० कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असं जाहीर केलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 5, 2013, 11:09