Last Updated: Sunday, September 22, 2013, 13:08
www.24taas.com, झी मीडिया, नैरोबीकेनियाची राजधानी नैरोबीमधील शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांसह ४३ जणांचा मृत्यू झालाय. तर १५० जण जखमी झालेत.
मृतांमध्ये ठार झालेले दोन्ही भारतीय मुळचे चेन्नईचे आहेत. यात नैरोबित आयटी इंजीनियर म्हणून काम करणारे श्रीधर नटराजन यांचा समावेश असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झालीये. तसंच एका आठ वर्षीय भारतीय मुलाचाही यात मृत्यू झालाय. ग्राहकांच्या वर्दळीचं ठिकाण असणाऱ्या वेस्टगेट मॉलमध्ये हा हल्ला करण्यात आला.
हल्लेखोरांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. या हल्लेखोरांना ठार मारण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती मिळतीये. हल्लेखोरांनी हल्ला करताना हँडग्रेनेडचाही वापर केल्याची माहिती रेडक्रॉसच्या अधिकाऱ्यांनी दिलीये. सोमालियातील दहशतवादी संघटना अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, September 22, 2013, 13:08