Last Updated: Saturday, September 7, 2013, 12:13
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टनअमेरिकेत दोन भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुखवटा लावून आलेल्या लोकांनी येथील एका दुकानात दोघा भारतीयांना गोळ्या घातल्या.
या गोळीबारात जगतार भट्टी (५७) आणि पवन सिंग (२३) हे ठार झालेत. नॉर्थर्न इंडियाना सिटीतील मिडलबरी रस्त्यावरील दुकानात गुरुवारी ही घटना घडली. पोलीस या दुहेरी हत्याकांडाचा तपास करीत आहेत.
हे दोघे जालंधर येथील आहेत. ते अमेरिकेत शॉपिंग स्टोअर्स चालवित होते. गुरूवारी सकाळी सहायक पवन सिंग हा दुकान उघडण्यास उशिरा पोहचला. याचवेळी काही लुटारूंनी त्यांच्यावर फायरिंग केली. तेथील काही माल घेऊन लुटारू फरार झालेत.
जगतार यांच्या मुलाने त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. या हत्येनंतर त्यांचा भाचा अमेरिकेत जाणार आहे. जगतार यांना एक मुलगी, मुलगा आणि सून आहे. तर पत्नी आणि एक मुलगा जालंधरमध्येच राहतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, September 7, 2013, 12:13