अमेरिका निवडणुकीत कोण बाजी मारणार?, U.S. President election - Who will win?

अमेरिका निवडणुकीत कोण बाजी मारणार?

अमेरिका निवडणुकीत कोण बाजी मारणार?
www.24taas.com, न्यूयॉर्क

महासत्ता असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची जगभरात चर्चा आहे. आर्थिक विकासाच्या मुद्दासह काही प्रश्नांबाबत प्रतिकूल परिस्थिती असतानाही बराक ओबामा यांनी दुस-यांदा निवडून येण्यासाठी कंबर कसलीये. प्रतिस्पर्धी रोम्नी यांनी त्यांना जोरदार टक्कर दिलीये.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बराक ओबामा आणि मिट रॉमनी यांनी सर्व ताकद झोकून दिलीय. अखेरच्या ४८ तासांत दोन्ही उमेदवार आपणच अमेरिकेसाठी योग्य असल्याचं सांगतायत. अमेरिकेला चांगलं भविष्य कोण देऊ शकतं याचा विचार करण्याचा सल्ला ओबामांनी दिलाय.. रोमनी आणि ओबामा यांनी एकमेंकावर हल्लाबोल केलाय.

काही मुद्यांवर विरोध असतानाही आफ्रिकन-अमेरिक समुदायाचा ओबामांना पाठिंबा आहे... अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन लोकांपुढं बेरोजगारीचं मोठं संकट आहे आणि समलैंगिक विवाहाला सुद्धा ओबामांचा विरोध आहे... असं असतानाही ते ठामपणे ओबामांच्य़ा पाठिशी आहेत. २००८ साली ओबामांना ९५ अश्वेत टक्के मतं मिळाली होती. मात्र गेल्या तीन वर्षात अश्वेत बेरोजगारांची संख्या १४ टक्क्यांच्या पुढं गेलीय..

सँडी वादळाचा तडाखा अमेरिकेला बसलाय. निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीतून वेळ काढत ओबामांनी पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ काढला. या वादळामुळं १०६ जणांनी प्राण गमावलेत.. मदत आणि बचावकार्य कशाप्रकारे झालं याचा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर परिणाम होणार आहे..

या निवडणुकीत राजकारणासोबत विविध रंग पाहायला मिळतायत...मिट रॉमनी यांच्या विधानामुळं नाराज झालेल्या नागरिकांनी मिलियन पपेट मार्च काढला... विविध रुपांतल्या पपेट्सनी रस्त्यावर येऊन निषेध केला... पब्लिक टेलिव्हिजन आणि बिग बर्डविषयी रॉमनी यांच्या विधानाचा हे सर्व विरोध करत होते.. तिकडे ओबामांच्या समर्थनार्थ माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही उतरले.

प्रसिद्ध पॉप स्टार केटी पॅरीनं सुद्धा ओबामांच्या समर्थनार्थ प्रचार केला. विस्कॉन्सिनमध्ये ओबामांना पाठिंबा देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात केटी पॅरीच्या डान्स ग्रुपनं धम्माल उडवली. प्रचाराच्या रणधुमाळीच्या अखेरच्या टप्प्यात कडवी झुंज देणारे ओबामा आणि रॉमनी एकमेंकाना कोणती संधी गमावू देण्याच्या विचारात नाहीत.

काय म्हणालेत, मिट रॉमनी

राष्ट्राध्यक्षाच्या विधानामुळं माझ्यासह सा-यांना चकीत केलं असणार. मतदान हे बदला घेण्यासाठी असल्याचं त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय. बदला घेण्यासाठी ते व्होट अपील करतायत.. मी तुम्हाला सांगतोय की देशासाठी मतदान करा.. वेळ आलीय की अमेरिकेला योग्य दिशेला नेण्याची.

बराक ओबामा काय म्हणालेत?

मला वाटतं की रॉमनी यांना कठीण प्रसंगातून जावं लागलंय.. कारण त्यांचा नेहमीच ऑटो इंडस्ट्रीला वाचवण्याला विरोध होता. सत्यापासून पळणं कठीण असतं... जेव्हा ते व्हीडीओ टेपवर असतं...हा काही खेळ नाही... लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे.

First Published: Monday, November 5, 2012, 15:15


comments powered by Disqus