आईच्या क्रेडीट कार्डावर त्यानं विकत घेतली भंगारगाडी, uk boy buys bin lorry worth 3500 pounds with mo

आईच्या क्रेडीट कार्डावर त्यानं विकत घेतली भंगारगाडी

आईच्या क्रेडीट कार्डावर त्यानं विकत घेतली भंगारगाडी

www.24taas.com, झी मीडिया, लंडन

रद्दी आणि टाकाऊ वस्तूंचा तुम्ही फुकटात विकून टाकत असाल, नाही का? पण, पैसे देऊन याच टाकाऊ वस्तू तुम्ही खरेदी नक्कीच करणार नाहीत... पण, लंडनमध्ये एका चिमुरड्यानं तब्बल ३५०० पाऊंड किंमत देऊन एक मोठी कचरा लॉरीच खरेदी केलीय.

आपल्या आईचं क्रेडीट कार्ड वापरून लंडनमध्ये एका पाच वर्षांच्या मुलानं एक भली मोठी कचरा लॉरी खरेदी करून टाकली. केंब्रिजशायरचा रहिवासी असलेला विल्यम बॅटमॅननं आपल्या आईच्या कम्प्युटरवरून ईबेवर जाऊन एका लॉरीसाठी ३५०० पाउंडची बोली लावली. जेव्हा, त्याच्या आईला या ऑनलाईन निलामीत आपण लिलावात जिंकलोय ही गोष्ट समजली तेव्हा
तिला हसावं की रडावं, हेच कळेनासं झालं... तिला मोठा धक्का बसला. परंतु, नंतर ईबेला सगळी हकीगत सांगत त्यांनी हा ऑनलाईन करार रद्द केला.

`जेव्हा मी ईबेवर आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन केलं तेव्हा विल्यमनं लॉरीसाठी बोली लावली. त्याला टाकाऊ आणि रद्दीमध्ये जरा जास्तच वेड आहे. तो लोकांनाही त्यांचा कचरावाला कधी येतो? आणि त्यांना आपल्या घरातील कचऱ्याला रिसायकल करायचंय का? असं प्रश्नही विल्यम त्यांना विचारतो` असं विल्यमच्या आईनं म्हटलंय.

डेली एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, विल्यम `ऑटीझम`चा आजार आहे. आणि तो मोठा झाल्यावर रिसायकल प्लांट मॅनेजर बनण्याची स्वप्न बघतोय. त्याच्याजवळ तुटलेले-फुटेलेली खेळणी, गाड्या, छोट्या कार आणि पॅकिंगच्या सामानाचं मोठा स्टॉक आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 5, 2014, 17:45


comments powered by Disqus