आता नरेंद्र मोदी अमेरिकी काँग्रेसपुढं भाषण करणार?US Congressmen invite ‘dynamic’ Narendra Modi to Am

आता नरेंद्र मोदी अमेरिकी काँग्रेसपुढं भाषण करणार?

आता नरेंद्र मोदी अमेरिकी काँग्रेसपुढं भाषण करणार?
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेनं ज्यांना गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून व्हिसा नाकारला होता त्याच नरेंद्र मोदी यांना आता अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करण्यास मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.

नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी येताच येत्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिकी काँग्रेसपुढं त्यांचं भाषण व्हावं यासाठी काँग्रेस सदस्य आणि परराष्ट्र कामकाजविषयक समितीचे अध्यक्ष एड. रॉयस आणि जॉर्ज होल्डिंग यांनी एका निवेदनाद्वारं मागणी केली आहे.

आर्थिक, राजकीय, सुरक्षाविषयक मुद्द्यांमध्ये भारताचं महत्त्व अमेरिकेच्या दृष्टीनं असाधारण असून दक्षिण आशियात भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे, असं उभय काँग्रेस सदस्यांनी पत्रात म्हटलंय. २० जून रोजी त्यांनी हे पत्र लिहिलंय. दोन्ही राष्ट्रांमधील परस्परसंबंधांसाठी अमेरिकेनं म्हणूनच निकटवर्तीय म्हणून काम करायला हवं, असंही या निवेदनवजा पत्रात म्हटलंय. सभापती जॉन बोनर यांना हे निवेदन देण्यात आलंय.

मोदी यांच्या पूर्वी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००५मध्ये अमेरिकी काँग्रेसपुढं भाषण केलं होतं.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 22, 2014, 22:03


comments powered by Disqus