Last Updated: Tuesday, October 22, 2013, 16:38
www.24taas.com, झी मीडिया, मॉस्कोसध्या मॉस्कोमध्ये कडाक्याची थंडी आहे, अशात पंतप्रधान मनमोहन सिंग दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहे. या थंडीच्या वातावरणात भारत-रशिया संबंधातील उब अजूनही कायम आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देण्यासाठी तीन स्पेशल गिफ्टची निवड केली आहे.
भारत-रशिया संबंधांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या संबंधांना अजून मजबूत करण्यासाठी पुतीन यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना हे तीन गिफ्ट देऊन पुतीन यांनी आश्चर्याचा धक्का दिल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.
या तीन गिफ्टमध्ये पहिले गिफ्ट हे रशियाचे सम्राट निकोलस २ यांची चित्र आहे. ते १८९०-९१मध्ये भारत दौऱ्यावर होते, त्यावेळी हे चित्र काढण्यात आले होते. तर दुसरे गिफ्ट हे १६ व्या शतकातील भारताशी संबंधी नकाशा आहे. तर तिसरे गिफ्ट हे मुगलकालीन नाणं आहे.
भारतीय राजदूत अजय मल्होत्रा यांनी या गिफ्ट बद्दल बोलताना सांगितले की, हे गिफ्ट स्वतः पुतीन यांनी निवडले असून भारत रशिया संबंधाना जे ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचे हे प्रतिक आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 22, 2013, 16:38