पाक अभिनेत्री वीना मलिकचे भारताबद्दल अश्लील ट्विट , veena malik`s india sucks twitt

पाक अभिनेत्री वीणा मलिकचे भारताबद्दल अश्लील ट्विट

पाक अभिनेत्री वीणा मलिकचे भारताबद्दल अश्लील ट्विट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिला भारताने नवी ओळख करून दिली. त्या वीणा मलिकने भारताबद्दल संतापजनक अश्लील ट्विट केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

पाक अभिनेत्री वीणा मलिक हिने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. भारताबद्दल तिने वादग्रस्त टिवटिव केली आहे. ‘ट्विटर‘वरून वीणाने चक्क ‘इंडिया सक्स‘ असे अश्लील ट्विट करून नवा वाद ओढवून घेतला आहे.

भारत सोडून गेल्यानंतर वीणाने सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी आपल्या निकृष्ट दर्जाला साजेसा आणि स्वस्तातला प्रयत्न ट्विटरवरून केल्याचे दिसत आहे. तिला नाव मिळवून दिले त्याच भारत देशाला बदनाम करायला निघालेल्या वीणा मलिकच्या या ट्विटनंतर सर्व स्तरांतून अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हा वाद पेटल्यानंतर वीणाने ट्विटरवरील आपल्या एका चाहत्याची प्रतिक्रिया ‘रिट्विट` केली. वीणाचे ट्विट हे भारतातील गुन्हेगारीच्या परिस्थितीवरील एक प्रतिक्रिया असल्याचे असल्याचे `त्या` चाहत्याने म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 15, 2014, 20:53


comments powered by Disqus