व्हेनेझुएला अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा लढा अखेर संपुष्टात, Venezuela`s President Hugo Chavez dies of cancer

व्हेनेझुएला अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा लढा अखेर संपुष्टात

व्हेनेझुएला अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा लढा अखेर संपुष्टात
www.24taas.com, काराकस

तेलसमृद्ध व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांची कर्करोगाशी दिलेला लढा संपुष्टात आलाय. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना कर्करोगाची चाहूल लागली होती. वयाच्या ५८व्या वर्षी राजधानी कराकास इथं त्यांचा मृत्यू झालाय.

दक्षिण अमेरिकेतल्या डाव्या विचारसरणीच्या राजवटींपैकी चावेझ यांची एक राजवट होती. जिवंतपणी आख्यायिका बनलेले व व्हेनेझुएलातील `गरीबांचे मसिहा` समजल्या जाणाऱ्या चावेझ यांचे प्राण वाचविण्यासाठी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्यावर केमोथेरपीपासून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र, आजार बळावतच गेल्याने सर्व उपचार व्यर्थ ठरले. चावेझ यांच्या निधनामुळे लॅटिन अमेरिकेतील देशांना जबरदस्त धक्का बसला आहे.

दरम्यान, ह्युगो यांचा मृत्यू `पारंपारिक शत्रूं`नी म्हणजेच अमेरिकेनं केलेल्या विषप्रयोगामुळे झाल्याचा आरोप व्हेनेझुएलाचे उपाध्यक्ष निकोलस मारुदो यांनी केलाय

First Published: Wednesday, March 6, 2013, 11:10


comments powered by Disqus