Last Updated: Wednesday, June 18, 2014, 22:04
www.24taas.com, वृत्तसंस्था, बगदादइराकमधलं संकट अधिकाधिक गहीरं होत जातंय. इराकमधल्या या अमानूष नरसंहाराचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय. अतिशय क्रूर असा हा व्हिडिओ तुम्हाला विचलीत करू शकतो.
कोणत्या शहरातला हा व्हिडिओ आहे याची नक्की माहिती मिळालेली नाही. पण हा व्हीडीओ इसिस या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांच्या क्रूरतेची साक्ष देतो. इराकमध्ये शिया आणि सुन्नी यांच्यात प्रचंड संघर्ष सुरू आहे. सुन्नी दहशतवादी शिया सैनिकांना मारत आहेत. शरण आलेले सैनिक आणि सर्वसामान्य कोणालाच इसिसचे दहशतवादी दयामाया दाखवत नाहीयेत.
इसिस ही अलकायदाचीच एक ब्रँच आहे. १९९१ नंतरचा हा सर्वात मोठा नरसंहार असल्याचं बोललं जातंय. इसिसचे अतिरेकी बगदादच्या खूपच जवळ पोहोचले आहेत. ते केव्हाही बगदाद शहरावर कब्जा करू शकतात. युट्यूबवर अपलोड झालेला हा व्हिडिओ कोणत्या जागेवर चित्रित झालाय याची माहिती नाही. झी मीडिया या व्हिडिओच्या सत्यतेबाबतही पुष्टी करत नाही. मात्र यात जे दाखवलं जातंय ते नजरेआड करता येणार नाही.
पाहा व्हिडिओ*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 20:14