सीरियावर कारवाई केल्यास खबरदार- पुतिन यांची चेतावनी Vladimir Putin doesn`t rule out backing military action in Syria

सीरियावर कारवाई केल्यास खबरदार- पुतिन यांची चेतावनी

सीरियावर कारवाई केल्यास खबरदार- पुतिन यांची चेतावनी
www.24taas.com , झी मीडिया, मॉस्को

सीरियावर एकहाती कारवाई विरोधात रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतिन यांनी पश्चिमी राष्ट्रांना चेतावनी दिलीय. मात्र त्याचबरोबर दमिश्कनं जर आपल्या नागरिकांवर विषारी गॅसचा वापर केला असेल, तर त्यांच्याविरोधत सैनिकी कारवाईला आपण पाठिंबा देऊ, असंही पुतिन यांनी स्पष्ट केलं.

पुतिन यांनी एका मुलाखती दरम्यान हे सांगितलं की, मॉस्कोनं सीरियाला एस-३०० हवाईरक्षा मिसाईल प्रणालीचे काही उपकरणं आणि सामान पुरविलंय. मात्र नजिकच्या काळात याबर बंदी घालण्यात येईल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या परवानगीशिवाय पश्चिमी राष्ट्रांनी सीरियावर हल्ला केला तर रशिया आपले शक्तीशाली मिसाईल कुठेही पाठवू शकते, असा इशाराच पुतिन यांनी अमेरिकेला दिलाय.

सेंट पीटर्सबर्ग इथं जी-२० देशांच्या सुरू होणाऱ्या शिखर परिषदेच्या अगोदर पुतिन यांची मुलाखत प्रसिद्ध झालीय. बैठकीत जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. मात्र सीरियात सुरू असलेल्या गृहकलहाबाबतही चर्चा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.

पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत होणारी बैठक रद्द झाल्याबाबत दु:ख व्यक्त केलंय. ही बैठक जी-२० शिखर परिषदेच्या आधी होणार होती. मात्र दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सीरिया आणि इतर बाबतीत गंभीर स्वरुपाची चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013, 15:57


comments powered by Disqus