`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता; अमेरिकेला आव्हान, Vladimir Putin recognises Crimean indepe

`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता

`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता
www.24taas.com, झी मीडिया, कीव

शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.

वॉशिंग्टनसाठी हे एक खुलं आव्हान मानलं जातंय. त्यामुळेच, युरोपला आणखी काही संकटांचा सामना करावा लागू शकतो.

रशियातील एक भूभाग असलेल्या क्रिमिया या बेटाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात आल्याचं `क्रेमलिन`च्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय.

यापूर्वी अमेरिका आणि युरोपीय संघानं रशिया तसंच क्रिमियाई संकटात सहभागी असणाऱ्या यूक्रेनच्या अधिकाऱ्यांवर अनेक प्रतिबंध लावले होते. तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी, रशियानं यूक्रेनमध्ये हस्तक्षेप बंद केला नाही तर कडक कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. त्यामुळे, ब्लादिमीर पुतीन यांचं हे पाऊल अमेरिकेसाठी एक आव्हानंच मानलं जातंय.

मॉस्कोचे सैनिक क्रिमियातून निघून जावं, अशी पश्चिमी देशांची इच्छा आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, क्रिमिया रशियाचाच एक भाग आहे.

काळ्या सागराच्या किनाऱ्यास्थित अतिशय महत्त्वाच्या अशा या बेटावर रशियातील सैनिकांनी गेल्या महिन्यात वर्चस्व मिळवलंय. यूक्रेनमध्ये रविवारी एक जनमत चाचणी घेण्यात आली होती. यात ९७ टक्के नागरिकांनी स्वतंत्र क्रिमीयाच्या बाजूने कौल दिला. मात्र क्रिमियावर ताबा मिळवण्यासाठीच रशियाने ही जनमत चाचणी घेतल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

क्रिमियाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यानंतर हा भूभाग आपल्यात समाविष्ट करण्यासाठी हा रशियाचा एक डाव असल्याचं मानलं जातंय. दरम्यान, युक्रेनने मात्र रशियाच्या निर्णयाला तीव्र विरोध करत आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

काय सांगतो इतिहास...

१८ व्या शतकात क्रिमिया हा रशियाचाच एक भाग होता. परंतु, १९५४ साली तत्कालीन सोव्हियत नेता निकिता ख्रुश्चेव यांनी हा भूभाग यूक्रेनला हस्तांतरीत केला.

आता रशिया आणि क्रिमियातील बहुसंख्यांक मूळ निवासी रशियन लोक, रशियाच्या संबंधांना ऐतिहासिक अपमान दूर करण्याचा एक प्रयत्न मानत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात यूक्रेनमध्ये अशांती निर्माण झाली होती. एका महत्त्वपूर्ण करारावर राष्ट्रपती व्हिक्टर यानुकोविच यांनी हस्ताक्षर करण्यास नकार दिल्यानं त्यांच्याविरुद्ध प्रदर्शनाला सुरुवात झाली होती. लोकांचा राग इतका खवळला की फेब्रुवारीअखेर यानुकोविच यांना देश सोडून रशियात शरण घ्यावी लागली. यूरोपमध्ये सध्या हेच सर्वात मोठं सुरक्षा संकट मानलं जातंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 09:51


comments powered by Disqus