Last Updated: Wednesday, August 29, 2012, 13:45
www.24taas.com, वॉशिंग्टन गुरुद्वारावर गोळीबार करून सहा शीखांची हत्या करणाऱ्या तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या चकमकीत झाला नव्हता तर, पोलिसांची गोळी फक्त त्याच्या पोटात लागली होती... त्यानंतर स्वत:ला संपवण्यासाठी त्यानं स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
५ ऑगस्ट रोजी विस्कोसिनमधल्या ओकक्रिक भागातील एका गुरुद्वारावर अचानक हल्ला करण्यात आला होता. यावेळी सहा शीख भाविक मृत्यूमुखी पडले होते. हा हल्ला नेमका का करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर पोलीस अजूनही शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने जगभर खळबळ माजवली होती.
या हल्ल्यात ४० वर्षीय मायकल वेड पेज याचाही सहभाग होता. गोळीबारानंतर ओलिसांना सोडवण्यासाठी पोलिसांनीही मारेकऱ्यांवर हल्ला केला होता. यावेळी पेज याचा मृत्यू झाला होता. पेजच्या हातावर काही नक्षलीय कोड असलेले टॅटू पोलिसांना सापडले होते. यावेळी पोलिसांची गोळी पेजला लागून त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी वाटलं होतं. पण पोलिसांची गोळी पोटात लागून पेज फक्त जखमी झाला होता. त्यानंतर त्यानं आपल्याच हत्यारानं स्वत:च्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याचं आता समोर आलंय. विल्वौकी काऊंटी चिकित्सा शोध कार्यालयानं दिलेल्या अहवालात त्यांनी ही माहिती दिलीय.
First Published: Wednesday, August 29, 2012, 13:45