Last Updated: Wednesday, April 17, 2013, 16:12
www.24taas.com, न्यूयॉर्क तुम्ही कधी सहा वर्षांच्या मुलाला चार चाकी गाडी चालवताना पाहिलंय... नाही ना! पण, न्यूयॉर्कमध्ये हे खरोखरच घडलंय.
विश्वास ठेवा अगर नको... पण, अमेरिकेत एका सहा वर्षांच्या चिमुरडा चक्क खरीखुरी चार चाकी गाडी चालवत फिरायला घराबाहेर पडला. चायनीज नूडल्स खाण्यासाठी या मुलानं आपल्या वडिलांची कार घेऊन बाहेर पडला. जवळजवळ पाच किलोमीटरपर्यंत त्यानं आरामात ही कार चालविली.
थोडं पुढे गेल्यानंतर एका पोलिसांचं लक्ष या गाडीकडे आणि गाडीच्या चालकाकडे गेलं. त्यानंतर पोलिसांनी ही गाडी रोखली.
First Published: Wednesday, April 17, 2013, 13:13